तुळजापूर /प्रतिनिधी

 तालुक्यातील  काक्रंबा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण सोहळा गुरुवार दि. ७रोजी  पारंपारिक पध्दतीने  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

 काक्रंबा येथे पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिरावर  शिवराष्ट्र भजनी मंडळाने पुढाकार घेऊन गावात वर्गणी जमा करून कलश आणुन त्याची गावातुन पारंपारिक वाद्याचा गजरात मिरवणूक   काढण्यात आली यात  सजवलेल्या बैलगाडीत कलश  ठेवण्यात  आला होता. यात शेकडो महिला  डोक्यावर पविञ जलकुंभ घेवुन सहभागी  झाल्या होत्या. मिरवणूक मार्गावर घरोसमोर महिलांनी आकर्षक रांगोळी  काढली होती ही मिरवणूकमंदीरात आल्यानंतर  मंहत मावाजीनाथ बुवांचा हस्ते विधीवत कलश रोहणाचा धार्मिक विधी संपन्न झाला. यात 

 या कलश रोहनासाठी  गावातील भजनी मंडळ महिला, भजनी मंडळ शिवराष्ट्र भजनी मंडळ त्याचबरोबर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

 
Top