तुळजापूर  / प्रतिनिधी-

 हिंदू नववर्षच्या प्रथम दिनी गुढीपाडवा  सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शिखरावर  पहाटे  श्रीतुळजाभवानीचे मंहत श्रीतुकोजी बुवा व त्यांचे शिष्य मंहत वाकोजीबुवा यांनी गुढी उभारुन त्यांचे पुजन केले.

गुढीपाडव्या दिनी श्रीतुळजाभवानी मातेस सकाळी दुग्धअभिषेक केल्यानंतर वस्ञ नेसविण्यात आल्यानंतर एक नंबर डब्यातील संपुर्ण सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते.आज साडतीन शुभ मुहुर्तांन पैकी एक मुहुर्त असल्याने आज मंदीरात जावळ काढणेसह अनेक विधी मोठ्या प्रमाणात  संपन्न झाल्या.

श्रीतुळजाभवानी मंदीरातील गुढी उभारल्यानंतर  बहुसंख्य शहरवासियांनी भगव्या झेंड्याची  तर काहींनी वस्ञांची गुढी उभारली वर्षानुवर्षे   गुढीपाडवा दिनी भगव्या ध्वज घरावर उभारुन त्याचे पुजन करण्याच्या  प्रमाणात वाढ झाली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात पार पाडला. गुढीपाडवा दिनी शेतकऱ्यांनी  मराठी नववर्षाचा पार्श्वभूमीवर शेतातील पांडवाचे पुजन करुन त्यास नैवद दाखवला नंतर रान नववर्ष दिनी कुळवले.

 
Top