उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेनुसार कर्मचारी, अधिकारी यांना शासनाने सुधारित तीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे.

 क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्या सेवाविषयक बाबी प्राधान्याने सोडविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना केल्यानुसार या योजने अंर्तगत ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा पहिला (10 वर्षे), दुसरा (20 वर्षे) आणि तिसरा (30 वर्षे) लाभासाठीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले होते.

 त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 28 ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना पहिला लाभ आणि 20 ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी यांना दुसरा लाभ तसेच एक विस्तार अधिकारी (पं) यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी (पं) यांना त्यांच्या कार्यरत पदाची वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे.

 
Top