तेर  /प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील   तेर येथे प्रथमच भारतीय पारंपरिक राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचा  15 एप्रिल लाभ शानदार प्रारंभ झाला. ही  स्पर्धा उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली असून 15 एप्रिल ते १६ एप्रिल रोजी तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालायाच्या मैदानावर घेण्यात येणार आहेत . हा खेळ प्राचिन   काळातील भारतीय पारंपरिक खेळ असून तेर प्राचीन सातवाहनकालीन ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध आसल्यामूळे राष्ट्रीय लगोरी स्पर्धेचे तेर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे15 एप्रिलला  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय लगोरी फेडरेशनचे अध्यक्ष संदीप गुरव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले,संत गोरोबा काका दुध संस्थेचे माजी अध्यक्ष पद्माकर फंड, विठ्ठल लामतुरे, जुनेद मोमीन,भारत नाईकवाडी, नवनाथ इंगळे, मज्जित मनियार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उस्मानाबाद जिल्हा लगोरी असोसिएशनचे सचिव अमोल कस्तुरे यांनी केले.य

ावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे राष्ट्रीय लगोरी स्पर्धा होते ही गौरवास्पद बाब आहे असे प्रतिपादन केले.यावेळी लगोरी संघटनेचे तुषार जाधव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आपले विचार व्यक्त केले. स्पर्धेत 6 संघ मुलीचे व 11 संघ मूलाचे सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील विजेता संघ  थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे.  राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी दिल्ली, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक,पांडेचरी,छत्तीसगड ,तेलंगणा ,नगर हवेली दादर, महाराष्ट्र, झारखंड, गुजरात ,विदर्भ ,गोवा येथील लगोरी संघ सहभागी झाले आहेत.यावेळी उपस्थितांचे स्वागत अमोल कस्तुरे,प्रतिक नाईकवाडी,भुषण भक्ते, अजित कदम,लक्ष्मण राऊत, रियाज कबीर, नरेंद्र चंदले,अमर फंड, मंगेश पांगरकर यांनी केले.

 
Top