उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसर, उस्मानाबाद येथे उपकेंद्राचा नाट्यशास्त्र व लोककला विभाग तथा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केेले आहे. त्याचे उद्घाटन  उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.केे. गायकवाड  यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी डॉ. गणेश शिंदे (नाट्यशिबीर समन्वयक), डॉ. सय्यद अमजद (एन.एस.डी.दिल्ली), डॉ. उषा कांबळे (लोककला विभाग मुंबई) यांची उपस्थिती होती. 

  या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. संचालक डॉ. डी.केे. गायकवाड म्हणाले की, या कार्यशाळेचा लाभ या भागातील नाट्यकलेची आवड असणार्‍या विद्यार्थ्यांनी व नाट्यरसिकांना व्हावा. त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास व्हावा व नाट्यचळवळ वाढावी ही यामागची भूमिका आहे. या प्रशिक्षणात अभिनयावर भर असून नाट्यातून व्यक्तीमत्व विकास व्हावा व नाटकाचे शिक्षणातील महत्त्व समजावे हा हेतु आहे. ही कार्यशाळा दि.28 एप्रिल 2022 ते 06 मे 2022 या कालावधीत संपन्न होत आहे. या कार्यशाळेतील स्तनिसलवस्की आणि त्यांचा अभिनय सिध्दांत उत्स्फुर्त अभिनय अंगीक आणि वाचीक अभिनय, नैपथ्य, आहार्य आणि सात्विक अभिनय, प्रकाश योजना व संगीत संयोजन रंगभुशा आणि वेशभुषा, तमाशा तथा लोकनाट्य कला चित्रपट रसग्रहण या विषयी माहिती देऊन कार्यशाळेत सहभागी  झालेल्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले जात आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गणेश शिंदे यांनी केेले तर डॉ. उषा कांबळे यांनी आभार मानले.


 
Top