उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील सौदाना, वाकडी, निपाणी, वडगाव, हासेगाव, नगुलगाव, दाभा, आवाड शिरपुरा, हिंगणगाव, ताडगाव, घरगाव, नायगाव, पाडोळी, रांजणी,लोहटा ( पूर्व), लोहटा (पश्चिम ), कारंजकल्ला, कोथळा, रायगव्हाण, जायफळ, खडकी येथे शिवसेना पक्ष व पवनराजे फाउंडेशन च्या वतीने खासदार ओमदादा राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी शिधापत्रिका माझा हक्क या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गावोगावी जाऊन माझी शिधापत्रिका मध्ये नाव समाविस्ट करणे, हरवलेले खराब झालेली शिधापत्रिका तसेच नाव कमी, नाव दुरुस्ती व online करणे ही नागरिकांची सर्व समस्या जाऊन बघणे व त्याचे कागदपत्र घेऊन त्याची समस्या दूर करणे हे सर्व काही समस्या शिवसेना पक्ष व पावनराजे फाउंडेशन च्या माध्यमातून दूर करण्यात आलेली आहे.

 तसेच या कॅंम्प मध्ये काही गावातील प्रकरणे निकाली काढण्यात यश आल्याने पवनराजे फाउंडेशन टीम च्या वतीने सौंदाना, वाकडी, निपाणी, वडगाव येथे जाऊन डॉ. जयप्रकाश दादा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते माझी शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच पवनराजे फाउंडेशनव्दारा वारंवार राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे अवहान डॉ. जयप्रकाश दादा राजेनिंबाळकर यांनी केले. घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्या गेल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी उदय बाळासाहेब माकोडे, नारायण गुंड, परमेश्वर पालकर, बाबासाहेब निपाणीकर, सचिन पाटील, अमर गुंड, राहुल निपाणीकर, अंकुश देवकते, ज्ञानोबा लाकडे, भारत देवकते, कुलदीप गायकवाड, शिवाजी बनसोडे, विष्णू गाडेकर, नवनाथ गायकवाड, ऋषि पालकर, संदीप पालकर, विष्णू देवकते, अक्षय गायकवाड, सचिन पालकर, काकासाहेब कांबळे , रामकिसन चौधरी , महेश निपाणीकर, शिवाजी पाटील , नवनाथ गुंड, नवनाथ पाटील, बाळासाहेब गुंड, विश्वनाथ पाटील, लालासाहेब राऊत, शिवाजी पालकर, संदीपान भोसले इत्यादी नागरिक उपस्थित होते.

 
Top