उस्मानाबाद - कळंब तालुक्यातील चोराखळी नजिक राष्ट्रीय महामार्ग  वर झालेल्या विचित्र अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ७ जणांना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा (ता.वाशी) येथील गोळे कुटुंबातील सदस्य लग्न समारंभासाठी सकाळी उस्मानाबादकडे येत होते. त्याचवेळी उस्मानाबाद येथून परंड्याकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक अनुज्ञप्ती नोंदणीच्या शिबिरासाठी जात होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ज) गावाजवळ अचानक रस्त्यात जनावर आडवे आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून आरटीओ कार्यालयाची जीप (एमएच 06 -एडब्ल्यू  रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध मार्गावर आली. त्याचवेळी समोरुन येणार्‍या कारला जीपची जोराची धडक लागली. या अपघातात निर्मला सुरेश गोळे (65) ही वृद्ध महिला जागीच ठार झाली. तर एसटी महामंडळाचे नियंत्रक बाळासाहेब काळे (वय45) यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले, संगणक चालक सुनील पडवळ, एसटी महामंडळाचे नियंत्रक अनंत आदमाने (40), तेरखेडा येथील धीरज गोळे (25), शिवप्रसाद धीरज गोळे (1.5 वर्ष), वृषाली धीरज गोळे (24), चंद्रकला सदाशिव गोळे (70), प्रकाश सदाशिव गोळे (45) हे गंभीर जखमी झाले. प्रकृती चिंताजनक असलेल्या दोघांना उस्मानाबाद शहरातील इतर खासगी रुग्णालयात तर दोघांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

 
Top