उस्मानाबाद / प्रतिनिधी - उस्मानाबादच्या जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांची पदोन्नतीने बदली झाली असून त्यांच्या जागी अक्षय शिंदे उस्मानाबादचे नवे पोलिस अधीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

नीवा जैन पदोन्नतीने पदस्थापना अप्प 'र पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर येथे गेल्या आहेत तर पोलीस उपायुक्त नागपूर शहर अक्षय शिंदे हे उस्मानाबाद येथे नियुक्त केले आहेत.

शिंदे हे 2014 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी राज्य राखीव पोलिस दलाचे जालना अधीक्षक,नांदेडचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अहमदनगर येथे पोलिस उपअधीक्षक (गृह) येथे जबाबदारी पार पाडली.

 
Top