उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व  सुधीर भोसले यांच्या वाढदिवसानिमीत्त सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  करजखेडा ता. उस्मानाबाद येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात करखेडा व परिसरातील सर्व वयोगटातील २८० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सुभाष कळसुले यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे चेअरमन श्रीमंत शिंदे, मा.चेअरमन भुजंग चव्हाण, मा.सरपंच बिभीषन साळुंके, भाजपा तालुक सरचिटणीस लिंबराज साळुंके, ग्रा.प.सदस्य अमोल चव्हाण, धोंडीराम अदटराव, मनोज साळुंके, हाशांत मोरे, विशाल चव्हाण, पाटोदा प्रा.आ.केंद्राचे डॉ.प्रविण गंधोरे, आशा कार्यकर्त्या रुपाली नागटीळे, गंगा कांबळे, विद्या दुधंबे, मुख्याध्यापक जावळे सर तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबईचे डॉ अजित निळे, डॉ.प्रणीत गणवीर, डॉ.शहान शेख, डॉ.आयुष गुप्ता, डॉ.महेश लोहीया, डॉ परविन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ, पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, अशोक मिसाळ यांनी परीश्रम घेतले.

 
Top