उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत  उस्मानाबाद जिल्हयाच्या वतीने प्रसाद निबाळकर यांनी कास्य पदक पटकावून जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षक कैलास लांडगे यांनी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन दिल्यामुळे हे शक्य झाले त्यामुळेच या दोघाचाही  उस्मानाबाद  जिल्हा क्रीडा अधिकारी मीरा रायबान व भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच उस्मानाबाद जिल्हा ज्युदो आणि सायकलींग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात शाल पुश्पगुच्छ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

 तसेच याप्रसंगी नितीन काळे यांनी कास्य पदक कमावत उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल प्रसाद निंबाळकर यांची प्रशंसा करत, उस्मानाबाद जिल्हयात असे अनेक खेळाडू तयार करण्याची धमक असुन भविष्यात देखील खेळातील प्रत्येक क्षेत्रात असेच मानाचे तुरे जिल्ह्याच्या शिरपेचात वाढत राहो असा आशावाद व्यक्त केला. तसेच क्रीडा अधिकारी मीरा रायबान यांनीही प्रसाद निबांळकर यांचे कौतुक करत जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रा विषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जिल्हा ज्युडो संघटनेचे सचिव प्रविण गडदे, तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे, जिल्हा अॅथलेंटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, नगरसेवक अभिजीत काकडे, प्रवीण सिरसाठे, प्रकाश तावडे यांच्यासह विवीध एकविध संघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक संघटक उपस्थित होते.

 
Top