तेर/ प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. संत गोरोबा काका यांचा वार्षिक यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्री. संत गोरोबा काका यांच्या यात्रेनिमित्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत खरमाटे यांनी आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी सुरेश तायडे ,ढोकी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत, मंदिर ट्रस्टचे प्रशासक पी. बी. भोसले , आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वृषाली तेलोरे ,नायब तहसीलदार पी‌.एस. मुखाणे ,सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले, विद्युत मंडळाचे उपविभागीय अधिकारी भालचंद्र चाटे, तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनंदा मगरे, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर , तलाठी प्रशांत देशमुख,बीट अंमलदार प्रकाश तरटे, मंदिराचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर ,जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राचे  डॉ.श्याम पाटील, पोलिस पाटील फातेमा मनियार, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी,  इंद्रजीत कोळपे, सुधाकर बुकन, अमोल थोडसरे,रतन नाईकवाडी, भागवत भक्ते,केशव मुळे, मज्जित मनियार, विलास फंड,हरी खोटे,विजय कानडे, विकास भोरे,गोरख माळी, अनंत साखरे, सुभाष कुलकर्णी, मंगेश पांगरकर, अशोक डक, विठ्ठल कोकरे, काकासाहेब मगर, मारूती इंगळे, बालाजी पांढरे, अशपाक शेख,शितल जाधव,मिरा गाढवे, संगिता डोलारे,दैवशाला भोरे ,रेखा पांगरकर आदी उपस्थित होते.


 
Top