तुळजापूर (प्रतिनिधी) 

  तालुक्यातील सावरगाव येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात  पार पडला.

 शनिवार (दि.१६)सकाळपासूनच ग्रामस्थांची शंभू महादेव दर्शनासाठी गर्दी केली होती ,यावेळी मंदिर परिसरात शंभूमहादेव प्रतिष्ठान आणि ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीत विविध सोंगे साकारण्यात  आली होती ,यामध्ये पोतराज, शंकर-पार्वती ,गणपती,राम-सीता, बजरंग बली हनुमान, असे सोंगे येथील कलाकारांनी साकारले होते,पालखीसमोर गावातील युवकांनी लेझीम चे प्रात्यक्षिक केले, यात्रा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शंभूमहादेव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गाभणे ,यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष रमेश काडगावकर, उपाध्यक्ष चंद्रकांत गाभणे, ओंकार काडगावकर ,अमर कानवले ,दादाराव लगदिवे, नागेश अक्कलकोटे ,राहुल कानवले, भगवान लिंगफोडे, नागेश काडगावकर, राजशेखर काडगावकर, संजय माने ,महादेव गाभणे ,बालाजी फंड, एकनाथ अक्कलकोटे ,राहुल तोडकरी ,सुरज ढेकणे, योगेश काडगावकर, प्रवीण तोडकरी, अनिल गाभणे, किरण काडगावकर, यांच्यासह शंभू महादेव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ,समस्त ग्रामस्थ ,भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले.


 
Top