उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आरोपी केशव श्रीराम केंद्रे (४८, रा.फुलवळ, ता.कंधार, जि.नांदेड) यास उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन पकडले.
ढोकी पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उरळीकांचन (जि.पुणे) येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. पोलिसांना पाहुन पळून जात असताना सिनेस्टाइल पाठलाग करुन आरोपीस ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पोलिस उपनिरीक्षक ओव्हळ, पोलिस कर्मचारी हुसेन सय्यद , अमोल चव्हाण, शैला टेळे, अविनाश मारलापल्ले, साईनाथ आशमोड, योगेश कोळी, सुनिल मोरे, ढेकणे, चालक अरब, गोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.