उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 युगप्रवर्तक बहुउद्देशिय सामाजिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा घेण्यात आला.यां वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यां कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष त्रिशला गवळी होत्या. राज्यभरातून 200 पेक्षा जास्त निबंध प्राप्त झाले होते. त्याचे योग्य परीक्षण करून प्रथम क्र. संगिता सूर्यकांत घुगे अणदूर, यांना पाच हजार 131 रुपये तर  द्वितीय क्र. रोशनी भिकन निकम चोपडा जि.जळगाव यांना तीन हजार 131 रुपये  व तृतीय क्र.अस्मिता लहू लोखंडे सांजा जि. उस्मानाबाद यांना दोन हजार 131 रुपयांचे पारितोषिक  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्राणपत्राचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.राजा जगताप, प्रा.सूर्यकांत गायकवाड,(बीड) प्रा.बी.एस.सूर्यवंशी, प्रा.विनायकुमार सोनवणे (राययड,) ऍड.अश्विनी सोनटक्के, जगदीश जाकते व सुकेशनी वाघमारे हे उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आशा स्पर्धा घेण्याची गरज असल्याचे अस्मिताताई कांबळे यांनी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश ढोणे, त्रिशला गवळी, सिद्राम साखरे,रामदास गायकवाड,बाळासाहेब वाघमारे,  जगदीश जाकते,सुरेश भालेराव, चंद्रकांत मस्के,मिलिंद जानराव,गौतम रणदिवे शिवाजी साखरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामल ताकपिरे यांनी केले तर चंद्रकांत मस्के यांनी आभार मानले.


 
Top