उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जागीरदारवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी उपक्रमा माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जागीरदार वाडी तांडा वस्ती येथे प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन गावातील अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली. दिवस सुगीचे असल्यामुळे यांची प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन भेट घेतली.

जागीरदार वाडी तांड्यातील दोन प्रभागांमध्ये रेल्वे जात असल्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी होणारा त्रास तसेच रेल्वेच्या साईड ट्रेकमध्ये रोड नसल्यामुळे या गावाला उपळा वाट रस्ता करणे अत्यंत गरजेचा आहे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली. त्याचप्रमाणे मिसाळ शेतातील जोडतळे दुरुस्ती करणे, ग्रामसचिवालय तयार करणे, स्मशानभूमी तयार करणे व तीन तांड्यावर मिळून जागीरदारवाडी येथे पाणीपुरवठा मंजूर करणे व एक टाकी बांधणे अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

या वेळी सरपंच शशिकांत थावरा राठोड, ज्ञानदेव राठोड, तुकाराम चव्हाण, अविनाश चव्हाण, बाळू राठोड, संजय चव्हाण, धर्मा पौळ, विलास सुरवसे, नामदेव चव्हाण, फुलचंद चव्हाण, तसेच गावातील प्रमुख लोक उपस्थित होते.

शेतकरी कारखान्यांचे सभासद असून देखील त्यांचा ऊस कारखान्याने नेलेला नाही. मात्र, कारखाने बाहेरून ऊस आणून त्याचे गाळप करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येत्या १० दिवसांत या कारखान्याने आपापल्या क्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांचा ऊस प्राधान्याने नेवून गाळप करावे. तसेच जे शेतकरी कारखान्याचे सभासद व नोंद असताना देखील महिन्याच्या पुढे प्रोग्राम येऊन देखील ऊस तोडणी करीत नाहीत. या शेतकऱ्यांचे संबंधित कारखान्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश काढण्यात यावेत आदी मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष तात्या रोडे, जिल्हा महासचिव महादेव कांबळे, कळंब तालुकाध्यक्ष कल्याण तवले पाटील, बिभीषण कदम, एल.जी. शेख, राजेंद्र गायकवाड, हरिदास जाधव, राजकुमार देवकर व मोहन कदम आदी सहभागी झाले होते.

 
Top