उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात हरभरा पिकाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांना हरभरा पिकांना योग्य व किफायतशीर भाव मिळावा म्हणुन शासनाने आधारभुत किमतीवर जिल्ह्यात एफ.सी.आय. ची 19 खरेदी केंद्र सुरु केली आहेत व शेतकऱ्यांनी देखील महा एफ.सी.आय. च्या 40 खरेदी केंद्रामार्फत हरभरा पिकांची ऑनलाईन नोंदणी करुन या केंद्रावर हरभरा विक्री करत आहेत. हरभरा खरेदी संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी आढावा बैठक घेतली.

 एफ.सी.आय. मार्फत नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे हरभरा खरेदी केंद्राकडून खरेदी केलेला हरभरा एफ.सी.आयच्या गोडावुनवर दाखल होवुन देखील 4-4 दिवस मालाचे वाहन रिकामे केले जात नाही. सदरील वाहनातील हरभरा रिकामा करुन घेण्यासाठी नेमलेल्या हमाली कंत्राटदार यांनी अपुरे मनुष्यबळ दिल्यामुळे ही अडचण निर्माण होत आहे. तसेच कंत्राटदार हमाली मालकांकडुन वाहन रिकामे करताना गैरकारभार होत आहे. फुले व विक्रम या जातीचा हरभरा देखील परिपक्व असताना अपरिपक्व दाखवुन नाकारला जात आहे.

 तरी जिल्ह्यातील हरभरा केंद्र सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही अनुसरावी. तसेच प्रत्येक मालगाडी 24 तासाच्या आत रिकामी केली जाईल अशी उपाययोजना करावी तसेच आज तारखेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 4878 शेतकऱ्यांकडुन 34 कोटी 65 लाख इतक्या किमतीची हरभरा खरेदी केली आहे. मात्र या खरेदीपोटी निव्वळ देयक केवळ 4 कोटी 52 लाख रु. वितरित झाले आहे. तरी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी जेणेकरुन त्या रकमेचा वापर शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगाम पिक पेरणीसाठी करता येईल.

 याबाबत जनरल मॅनेजर FCI मुंबई श्री. मनमोहन सिंग सारंग यांना फोन द्वारे सूचना दिल्या असून याबाबत पत्रव्यवहार करून खरेदीमधील त्रुटी दूर केल्या जातील असे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कळविले आहे.

 यावेळी माजी उप जिल्हाप्रमुख शाम पवार, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम, काका शिनगारे,रवी इंगळे, अनंत देशमुख, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, वखार महामंडळ चे, FCI चे जिल्हा स्तरावरील अधिकारी, व हरभरा खरेदी केंद्र चालक उपस्थित होत

 
Top