लोहारा/प्रतिनिधी   

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे ग्रामदैवत माहात्मा बसवेश्वरांच्या यात्रे निमीत्त तीस एप्रिल ते दोन मे या कालावधीत यात्रा समितीच्या वतीने राजस्तरीरय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजीत करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांसाठी एकूण दीड लाख रुपयाचे रोख पारितोषिक व चषक ठेवण्यात आले आहे. 

ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त येथे अक्षयतृतीयापासुन तीन दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त अनेक वर्षापासून येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केली जातात. दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा ही यात्रा तीन ते पाच मे या कालावधीत पार पडत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून यात्रा समितीच्या वतीने राजस्तरीय नृत्य स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेसाठी राजभरातून स्पर्धक सहभागी होत आपला नृत्य आविष्कार सादर करतात या वर्षी * शनिवार (ता ३०) पासुन या स्पर्धेला सुरुवात होत असून या दिवशी सोळा वर्ष आतील बालगटाची वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा होईल. यात वैयक्तिक बालगट विजेत्यांना प्रथम पारितोषिक सात हजार शंभर रुपये, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार पाचशे रुपये व चषक देण्यात येणार आहे. याच दिवशी बाल समुह नृत्य स्पर्धा होणार आहे. या साठी विजेत्यांना प्रथम पारितोषिक आकरा हजार, द्वितीय सात हजार, तर तृतीय पाच हजार रुपये देण्यात येणार आहे * रविवारी (ता.१) प्रौढ गटातील नृत्य स्पर्धा होईल. यात लावनी व वैयक्तिक नृत्य (स्त्री) स्पर्धे साठी प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये ,द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार रुपये ठेवण्यात आली आहे. याच दिवशी पुरुष लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा ही होईल यासाठी प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार पाचशे रुपये ठेवण्यात आले आहे.* सोमवारी (ता.२) प्रौढ गटातील युगल नृत्य व समुह नृत्य स्पर्धा होईल. युगल नृत्यासाठी प्रथम पारितोषिक सात हजार, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार पाचशे रुपये ठेवण्यात आले आहे. याच दिवशी होणाऱ्या प्रौढ गटातील समुह नृत्यस्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे पंचवीस हजार, द्वितीय वीस हजार, तृतीय पंधरा हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क हे बालगटासाठी शंभर रुपये, प्रौढ गटासाठी दिडशे, समुह नृत्य गटासाठी दोनशे, रुपये ठेवण्यात आला आहे, अशी माहिती यात्रा समिती समितीच्या वतिने देण्यात आली आहे. 

 
Top