तेर/ प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री. संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त राज्यातील विविध ठिकाणाहून आज तेरमध्ये दिंडयाचे आगमन झाले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे श्री. संत गोरोबा काका यांच्या वार्षिक यात्रा सोहळ्यास 26 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेकरूंच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यात्रेकरूंना ये-जा करण्यासाठी विविध बस स्थानकातून जादा बसेसची सोय करण्यात आलेली आहे. यात्रेकरूंसाठी चार पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आलेली आहे. यात्रेकरूंच्या दृष्टिकोनातून मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरात व मंदिराबाहेर मंडप टाकण्यात आलेला आहे. तेर मध्ये राज्यातील विविध भागातून दिंड्या येत असल्यामुळेतेर मध्ये भक्तिमय वातावरण दिसून येत आहे.