उस्मानाबाद / प्रतिनिधी-

किशोरवयीन मुलींना संस्कृती विषयक ज्ञान व्यवहारज्ञान तसंच किशोर अवस्थेमधील मानसिक शारीरिक बदलांची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद वाढवण्याची गरज असून सशक्त समाज  निर्मितीसाठी किशोरवयीन मुलींच्या जडणघडणीची आवश्यकता असल्याचे मत उस्मानाबादच्या अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले यांनी व्यक्त केलं. त्या उस्मानाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने सुरू केलेल्या किशोरी विकास प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या अध्यक्षा सौ संगीता काळे प्राचार्य अनार साळुंखे डॉक्टर मीना जिंतुरकर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह एडवोकेट कृष्णा मसलेकर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना सौ आवले पुढे म्हणाल्या की किशोरवयीन मुलीची पहिली मैत्रीण ही आई असते. आईची आपल्या मुलीशी मैत्री असायला हवी.घरात मुलींची आई सतत बोलत राहिले पाहिजे.आज काल मोबाईल मुळे अनेक गोष्टी हातात आल्यात त्यामुळे त्यातील चांगला वाईट सांगून काय घेतलं पाहिजे? किशोरवयीन मुलींमधील हार्मोन्स मुळे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याबाबतीत त्यांना रुचेल  पचेल त्या भाषेत वारंवार संवाद करत राहण्याची गरज आहे. किशोरवयीन मुली मधील कॅल्शियम आयर्न वारंवार तपासणी करून त्यांना पोषण आहार मिळाला पाहिजे या  साठी प्रयत्न करण,  तिला योगासना आली पाहिजेत ,  तिला स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजेत , यासोबतच मुलींना व्यक्त होण्यासाठी मदत करण्याची आवश्यकता आहे असं त्या यावेळी म्हणाल्या.

   डॉक्टर मीना जिंतुरकर यांनी यावेळी आईनं मुलीची मानसिकता बदलण्यासाठी तिच्यासोबत वारंवार संवाद करत राहणं याची आवश्यकता व्यक्त केली. किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण टिकून राहण्याची गरज असून त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह प्रवाहित राहून , मुलींच्या आरोग्याची वाढ नीट होऊन त्या सुदृढ होतात. त्यामुळे मुलींच्या हिमोग्लोबिनची नियमित तपासणी करण्यासह  आरोग्याची काळजी आईने घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुलींच्या जडणघडणीत पालकांची भूमिका निश्चितच महत्त्वाची असते असंही त्या यावेळी म्हणाल्या.

   प्राचार्य अनार साळुंखे यांनी किशोरवयीन मुलींच्या मानसिकतेची पालकांना माहिती असण्याची आवश्यकता व्यक्त करून मुलींना संस्कृती यासह आपल्या घरातील वातावरण याची तिला वारंवार माहिती देत राहिल्यास तिचे मनोबल कौटुंबिक राहून एक चांगली गृहिणी ती होऊ शकते असे सांगितले. तर सौ. काळे यांनी जनकल्याण समितीने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह श्री कृष्णा मसलेकर यांनी जनकल्याण समितीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून या काळात समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जनकल्याण समितीने सुरू केलेल्या वेग वेगळ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कोरोना काळात जनकल्याण समितीने हाती घेतलेले  विविध उपक्रम त्यांनी सांगितले. आपत्तीच्या काळात जनकल्याण समितीच्या कामाच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. किशोरवयीन मुलींच्या मानसिक तसेच शारीरिक जडणघडणीच्या वेळी होणारी घुसमट लक्षात घेऊन त्यांना या वयात योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे , हीच गरज ओळखून जनकल्याण समितीने किशोरी  विकास प्रकल्प सुरू केल्याच त्यांनी सांगितले.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी उस्मानाबाद शहरातील आर्य चाणक्य विद्यालयात किशोरी विकास प्रकल्प चालवला जाणार असून त्यामध्ये  किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मिळणार आहे.किशोरी विकास प्रकल्पात प्रवेश घेण्यासाठी सौ माधवी भोसरेकर (मोबाईल क्रमांक 9421875228 )यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तर या किशोरी विकास प्रकल्पाच्या संचालन समिती मध्ये प्राचार्य डॉक्टर अनार साळुंखे डॉक्टर मीना जिंतुरकर डॉक्टर रेखा ढगे डॉक्टर सोनाली दीक्षित यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ उज्वला मसलेकर यांनी केले. आभार जनकल्याण समितीचे जिल्हा सहकार्यवाह श्री गिरीश पाटील यांनी मानले.


 
Top