उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदाराने मुंबई  येथील महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांच्या उस्मानबाद जिल्हा कार्यालयातर्फे विविध कर्ज योजनेंतर्गत कर्ज वितरीत करण्यात आले आहेत तसेच कर्ज परतफेडीची मुदत संपलेले अनेक लाभार्थीही आहेत. त्यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत.तथापि कर्ज रक्कमेच्या एकरक्कमी भरणा केल्यास व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

 राज्यात मागील दोन वर्षापासुन कोविड १९ ची गंभीर परिस्थती उदभवली असल्याने काही लाभार्थ्यांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. त्याअनुषंगाने थकीत कर्ज प्रकरणात वसुली व्हावी याकरिता ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबत एक रक्कमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येत आहे.

महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीने या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी लाभार्थीनी जिल्हा कार्यालयाच्या खालील पत्त्यावर जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रशासकीय इमारतीजवळ औरंगाबाद रोड, उस्मानाबाद भवन,  दुरध्वनी क्र. ०२४७२ २२३८८ वर संपर्क करावा.असेही आवहन करण्यात आले आहे.


 
Top