तुळजापूर  / प्रतिनिधी-  

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेवुन  छावा क्रांतिवीर सेनेच्या  आठव्या  अधिवेशना संदर्भातील आढावा बैठक सर्किट हाऊस तुळजापूर येथे मंगळवार दि २५रोजी उत्साहात  पार पडली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी  प्रथम उस्मानाबाद जिल्ह्यातील संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा घेतला. नंतर संघटनेच्या आगामी  अधिवेशनासंदर्भात मार्गदर्शन केले तसेच जिल्ह्यातील संघटनेच्या नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना गायकर म्हणाले की, संघटनेची ध्येय धोरणे पार पाडत असतांना सर्वात पहिले आपला पदाधिकारी व कार्यकर्ता हा आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा होईल याकडे लक्ष द्यायला हवे कार्यकर्ते सक्षम असतील तरच संघटना सक्षम होईल,समाज हिताचे काम करत असताना ते संविधानिक पद्धतीने कसे करावे तसेच अधिवेशनाच्या धर्तीवर संघटना बांधणी कशी करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 या बैठकी प्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष  बाबा रोटे ,महेश गवळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष,जीवनराजे इंगळे, प्रदेश प्रवक्ते मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख,अनिल माने युवा जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, दिगंबर ढगे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत अपराध, गणेश नलोडे भूम युवा तालुकाध्यक्ष, सुदर्शन पठाडे,पुरुषोत्तम जगताप,विनय व्हिसे, नानासाहेब बैरागी,धनाजी ढोरे परांडा,विष्णू भोसले उमरगा तालुकाध्यक्ष, संतोष साळुंखे भूम तालुकाध्यक्ष, योगेश कवडे वाशी तालुकाध्यक्ष, सुमित गोटाळे शहराध्यक्ष उमरगार,औदुंबर जमदाडे तुळजापूर तालुकाध्यक्ष,प्रशांत इंगळे,दत्ताजी बारगुळे, कुमार तात्या टोले तुळजापूर शहराध्यक्ष, प्रशांत इंगळ  युवक शहराध्यक्ष तुळजापूर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुळजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आजीनाथ आदिक यांच्या कार्यतत्परतेबद्दल सत्कार करत अभिनंदन केले.


 
Top