उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 संत शिरोमणी श्री. गोरोबा काकांच्या यात्रेचे आयोजन तेर येथे संत गोरोबा काका मंदिर देवस्थान तर्फे करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर शेकडो वर्षाची परंपरा असणारी यात्रा कोरोनानंतर पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्यामुळे जिल्हाभरातील भाविक भक्तांमध्ये उत्साह दिसुन येत होता. संत गोरोबा काका यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणुन या यात्रेकडे पाहिले जाते.

 प्रचंड ऊनाचा त्रास सहन करुन तेर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीकरीता तसेच उन्हाची दाहकता लक्षात घेता खा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि जिल्हाप्रमुख तथा आ. श्री. कैलास दादा घाडगे - पाटील यांच्यासह, धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन श्री. जयप्रकाश राजेनिंबाळकर, आ. श्री. कैलास घाडगे - पाटील यांचे बंधू श्री. आतिश घाडगे - पाटील यांनी 5,000 लिटर मठ्ठा व ताकाचे तसेच अन्नदानाचे वाटप यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांना केले. याचा लाभ हजारो भक्तांना मिळाला असून आज पहिल्या दिवशी जवळपास 35,000 ग्लास ताक वाटप झाले तसेच उद्या मठ्ठा व परवा ताकाचे वाटप करण्यात येणार आहे.

याप्रसंगी तालुकाप्रमुख  सतीश सोमाणी, माजी सरपंच  मुन्ना खटावकर, अविनाश इंगळे,  अविनाश आगाशे, जय कांबळे जिल्हा शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top