उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्याचे कृषी मंत्री यांच्या संकल्पनेतून  2017-2018 व 2019 या वर्षासाठी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या 198 शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार्थिंना,राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.हा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील दिडोरी रोड, म्हसरूळ येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात दि,२ मे,२०२२ रोजी होणार आहे. त्याचबरोबर दि.०१ मे,२०२२ रोजी त्याच ठिकाणी कृषि क्षेत्रातील महिलांचा सहभाग याबाबतचा कृषी मेळावा कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष उपस्थितीत घेण्यात येणार आहे,

  या कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणा-या १९८ शेतकरी पैकी पाच पुरस्कार प्राप्त शेतकरी उस्मानाबाद जिल्हातील आहेत.  २०१७ मध्ये  तेर येथील  प्रभावती रेवणसिध्द लामतुरे  यांनी आपल्या शेतामध्ये विविध फ़ळपिकांची लागवड करुन स्वतःचा आर्थिक स्तर उंचावला होता. जिल्हातील इतर शेतक-यांना फ़ळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले होते त्यामुळे शासनाने  त्यांचा उद्यानपंडित पुरस्कार देऊन गौरव केला आहे.   २०१८ मध्ये  भूम तालुक्यातील तात्यासाहेब तुळशीराम गोरे  यांनी त्यांच्या शेतात दरवर्षी शेणखताचा वापर,दहा घनमीटर क्षमतेचे बायोगॅस संयंत्रातून निघालेल्या शेणस्लरी आणि शेळी तसेच गाईचे गोमुत्र याचा वापर थेट मड पंपाव्दारे शेतीत केला जातो.शंभर टक्के क्षेत्रावर ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला.केळी पीकाचे G-9

 या जातीपासून एकरी ४० मे.टन इतके उत्पादन काढले. त्यामुळे त्यांचा शासनाने वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार देऊन गौरव केला.

 उस्मानाबाद तालुक्यातील झरेगाव येथील मल्लिकार्जून दशरथ सोनवणे यांनी शेतक-यांना विविध योजनेचा लाभ मिळावा तसेच मिळालेल्या योजनेमुळे त्यांना झालेला फ़ायदे शेतक-यांच्या यशोगाथा आणि आधुनिक पध्दतीने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने केली जाणारी शेतीची कामे तसेच फ़ळ प्रक्रिया केल्यामुळे होणा-या उत्पन्नातील वाढ याची ठळक प्रसिध्दीचे सविस्तर लेख वृत्तपत्रांमध्ये छापून शेतक-यांमध्ये जनजागृती केली. त्यामुळे त्यांना शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन गौरव केला आहे. तसेच परंडा तालुक्यातील शिराळा येथील चौरंगनाथ  भीमराव वाघमोडे  यांनी १५ एकर द्राक्ष बागेचे आधुनिक पध्दतीने संगोपन केले आहे. द्राक्ष प्रक्रिया करुन बेदाना निर्मिती केलेली. आहे त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होऊन अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच सामुदायिक शेततळे,बायोगॅस,कृषी यांत्रिकीकरणाचा वापर,संपूर्ण क्षेत्रावर ठिबक आणि तुषार सिंचन वापर करुन एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यांना शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

   उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील सतिश विठ्ठलराव खडके यांनी जमिनीपासून पाच फ़ूट उंच स्टेजवर उस्मानाबादी शेळी पालनाचा अभिनव प्रयोग केला आहे. त्याना 2019 मधील पुरस्कार जाहिर झाला त्यानी ५० शेळ्या पासून सुरु केलेल्या बंदिस्त शेळीपालनासाठी सर्व शेळ्या उस्मानाबादी जातीच्या आहेत. बंदिस्त शेळीपालन,पशुपालनासाठी एक एकर क्षेत्रामध्ये हिरव्या चा-यावर १५० शेळ्या आणि १० गाईचे नियोजन करुन ५७० ट्रेलर सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय कर्बाचा सर्व क्षेत्राला पुरवठा केल्यामुळे रासायनिक खतांच्या खर्चात बचत करता आली आहे. कमी खर्चात उत्पन्न दीड्पट वाढवल्यामूळे त्यांचा शासनाने वसंतराव

 नाईक कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या YOU Tube  चॅनल वरुन होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

 
Top