उस्मानाबाद (प्रतिनिधी) -

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची दि. 4 मे 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता पुणे येथील विधान भवन येथे संबंधित विभाग प्रमुखांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थित बैठक बोलावली आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी माहितीसह या बैठकीस उपस्थित राहवयाचे आहे.

या बैठकीत कोविड मुक्त गावाचा आढावा, शासनाच्या कोविड मधील उपाय योजना मधील निधी वाटप, एकल महिला आणि अनाथ बालके यांच्या बाबत  मालमत्तामध्ये  नाव नोंद करण्यासाठी विषेश मोहिम राबविणे, रोहोच्या कामाचा आढावा, महिला व बाल कल्याणचा आढावा, महिला सुरक्षा आणि महिला दक्षता समितीची आढावा घेण्‍यात येणार आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत 21 एप्रिल 2022 रोजी उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमुद मुद्यांयांची, त्यांच्या अनुपालनासह आणि उपरोक्त नमुद विषयांची त्या त्या विभागाशी संबंधित अद्यावत माहिती  या बैठकीस येताना संबंधितांनी घेवून उपस्थित राहवयाचे आहे. तसेच ही माहिती दि.30 एप्रिल 2022 पर्यंत सॉफ्ट व हार्ड कॉपीमध्ये सादर करावयाची आहे, असे निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी म्हटले आहे.


 
Top