तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे श्री शिवछत्रपती तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट  स्पर्धेच्या अंतिम सामना कासेगाव विरुद्ध आरळी क्रिकेट संघामध्ये झाला. यामध्ये कासेगाव संघाने विजय प्राप्त करत रोख 35 हजार बक्षीस पटकावत ट्रॉफीसह मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळवला.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा  अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अस्मिताताई कांबळे, तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. रेणुकाताई  इंगोले, जि.प.सदस्य महेंद्र धुडगुडे, प.स. माजी उपसभापती चित्तरंजन सरडे,पंचायत समिती सदस्य कविता कलसुरे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत कदम, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे,नागनाथ कलसुरे,सरपंच गोविंद पारवे,अनिता पारवे, ग्रा.प.सदस्य सौ.मधूमालती पारवे, सौ.मनीषा तानवडे,सारिका पारवे,सुनीता पारवे, मंगरूळ ग्रा.प.सदस्य गोविंद डोंगरे,आबासाहेब सरडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाजीराव जाधव,चेअरमन अनिल जाधव, आयोजक हवालदार संजय पारवे, आरळी बु महोत्सव अमिती अध्यक्ष सुनील पारवे, छावा संघटना जिल्हा अध्यक्ष महेश गवळी,प्रल्हाद जोत आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेमध्ये प्रथम विजेते संघ कासेगाव,द्वितीय आरळी बु,तृतीय वैराग,चौथे आरळी बु ,पाचवे बोरामनी आदी विजेत्या संघाला रोख बक्षिसे व ट्रॉफी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कासेगाव संघाचा खेळाडु आकाश चव्हाण ठरला. या स्पर्धेमध्ये 28 गावच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी निवृत्ती कोळी,पांडुरंग पारवे,पंच मकरंद बामनकर,महेश सरडकर,योगश खलाटे,परमेश्वर भोसले,अमर खलाटे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top