उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 अविकसित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात एक वेगळी छाप टाकलेली आहे. जिल्ह्यास अनेक पदके, पुरस्कार प्राप्त करून देणारे खेळाडूंची स्पर्धेतील कामगिरी महत्वपूर्ण असून आंतराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याची ओळख करून देणारे खेळाडूच जिल्ह्याची खरी संपत्ती असल्याचे मत नितीन काळे यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावर वरिष्ठ गटातील जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत जगताप होते, यावेळी स्पर्धा निरीक्षक सतीश मुंडे, जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, राजेश भोवळ, प्रवीण  गडदे, कुलदीप सावंत, ओम नाईकवाडी, माउली भुतेकर,नुकतीच psi पदी निवड झालेले अभिजित जगताप,शुभम म्हेत्रे,व कु सरोजिनी इंगळे आदींची प्रमुख उपस्तीथी होती.

स्पर्धेत जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे सहसचिव राजेंद्र सोलनकर, सदस्य संजय कोथळीकर, लक्ष्मण मोहिते, मुनीर शेख, अश्विनी पवार, प्रशांत बोराडे, सुजीत पवार, ऋषिकेश काळे, राम भुतेकर, सुरेंद्र वाले, अजिंक्य वराळे, अनिल भोसले, रोहित सुरवसे, राहुल जाधव, आवारे आदींनी पंच म्हणून काम पहिले.


 
Top