13 जोडपे विवाहबंधनात
उस्मानाबाद (प्रतिनिधी)
लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवारी उस्मानाबाद येथे विवाह सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी एकूण 13 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. यापैकी 2 विवाह बुद्ध पद्धतीने तर 11 विवाह हिंदू पद्धतीने करण्यात आले.
लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 38 वा सामुदायिक विवाह सोहळा उस्मानाबाद येथील छाया दीप मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख, तुळजापुर विधानसभेचे आ.राणा जगजितसिंह पाटील, अध्यक्ष रोहन देशमुख, मनिष देशमुख, श्री.रामराजे (मामा) पाटील,शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यशदा मल्टीस्टेटचे चेअरमन सुधीर सस्ते,व्यंकट गुंड, पवनराजे मल्टीस्टेटचे चेअरमन जयराजे निंबाळकर, दरेकर महाराज, रामदास कोळगे,दुय्यम निंबधक बार्शी तालुका सुरेश मंडलिक, फाऊंडेशन संचालक जितेंद्र लाड, व जिल्ह्यातील भाजपा नेते पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या सोहळ्यात वधू-वरांना हळदी व लग्नाचे कपडे, मणिमंगळसूत्र, चप्पल, बूट, संसारोपयोगी भांडी अशा सर्व वस्तू लोकमंगल फाउंडेशनमार्फत देण्यात आल्या. यावेळी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये सुमारे 110 जणांनी सहभाग नोंदवला.