उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 शिक्षा संस्कृति उत्थान न्यास नवी दिल्ली व प्लाईंग किड्स इन्टरनॅशनल इंग्लीश स्कूल आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये संपन्न झाली. 

प्रथम सरस्वती प्रतिमा पुजनासह दिप प्रज्वलनानी  कार्यशाळेच्या सुरुवाती स मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. प्लाईंग किड्स इन्टरनॅशनल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य चंद्रमणी    चर्तुवेदी  या कार्यशाळेस संबोधित करताना पालक पाल्यातील हितगुज कसे असावे पालकांची पाल्याची जवाबदारी काय याबाबतीत प्रश्नपत्रिका देऊन  पालकांकडून सोड वून घेण्यात आली. पालकांच्या प्रश्नोत्तरानंतर शेवटी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमा सुधीर पाटील पालक प्रतिनिधी सौ. अर्चना अंबुरे, उपजिल्हा संयोजक प्राचार्य डॉ. अजित मसलेकर न्यासचे जिल्हा संयोजक शेषनाथ दगडोबा वाघ यांचे हस्ते सर्व पाल कानां सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. 

कार्यशाळा यशस्वीते साठी सुरेश वाघमारे , सुभाष भोसले , राठोड सर्व शिक्षकशिक्षिका वृंद यांनी परिश्रम घेतले.सुत्र संचलन अंकिता तांबारे व वासुदेव आवारे यांनी आभार मानले राष्ट्रगीता नी कार्यशाळेची सांगता करण्यात आली.


 
Top