उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 समाजातील विविध घटकांचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांत सहभाग वाढविण्यासाठी, क्षयरोगाबाबत असलेली समाजील गैरसमज दूर करण्यासाठी, क्षयरोगा संबंधिचे नियमित ओषधोपचाराच्या फायदयाची माहिती देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी अधिक तळमळीने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगाकर यांनी केले आहे. श्री.दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टिबी फोरम समिती आणि जिल्हा टिबी कोमोरबीडीटी समन्वय समिती यांची बैठक नुकतीच  जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. तेंव्हा ते बोलत होते.

 या बैठकीमध्ये आढावा घेतला असता असे निदर्शनास आले की, जे खाजगी वैद्यकिय व्यवसायिक नोटिफाय करत नाहीत अशा वैद्यकीय व्यवसायिकांनी संशयित क्षयरुग्ण पब्ल‍िक हॉस्पीटल सदर्भीत करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच जिल्हा टिबी मुक्त करण्याच्या दृष्टीने खाजगी वैद्यकिय व्यवसायिक आणि खाजगी केमीस्ट यांनी आपले योगदान वाढविण्यासाठी आवाहन करण्यात आले.

 जिल्हयातील आरोग्य संस्थानिहाय आढावा घेण्यात आला. सर्व शासकीय आरोग्य संस्थांनी बाह्य रुग्ण विभागातंर्गत उद्दिष्टाप्रमाणे काम करण्यात यावे आणि आरोग्य संस्थानिहाय दिलेले टिबी नोटिफीकेशनचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत आदेशित करण्यात आले. 2021 यावर्षी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांत राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.

 या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि.प.चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन, टी, बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डि.के. पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रफीक अन्सारी, जि.प.चे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. के. के. मिटकरी, वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल वडगावकर, डॉ. प्रविण डुमणे, डॉ. किरण गरड, डॉ. विवेक होळे, श्री. महादेव शिनगारे श्री. रवि संगमकर,  ग्रामीण रुग्णालय सास्तूरचे प्रशासकीय अधिकारी आर. बी. जोशी, टिबी चम्पीयन नंदकुमार वानवट, वजीर शेख आदी उपस्थित होते.टिबी फोरम समितीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व उपस्थित सदस्य यांचे आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सदस्य सचिव टिवी फोरम समितीचे डॉ. रफीक अन्सारी यांनी व्यक्त केले.

 
Top