उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील नूतन प्राथमिक विद्यामंदीर येथे  अंधश्रद्धा व कोरोनाची होळी  करण्यात आली.होळी साजरी करताना लाकूड,गोवरी यांचा वापर  न करता कचरा जाळून होळी साजरी करण्यात आली . 

झाडांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पाहता वृक्षसंवर्धन करणे म्हणजे आपले कर्तव्यच आहे म्हणून आपण होळी साजरी करताना लाकडाचा वापर करू नये.त्याचप्रमाणे शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून होतो आणि म्हणूनच शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या होळीसाठी वापरु नयेत. त्याचप्रमाणे आपल्या अंगी असलेल्या वाईट गुण म्हणजेच आळस , मोबाईलचा अतीवापर,  मैदानी गेम न खेळता मोबाईल गेम खेळणे , अभ्यासाचा कंटाळा करणे , अंधश्रद्धा ,कोरोना या सारख्या वाईट गुणांचे दहन करुन चांगले गुण म्हणजेच वाचन करणे, मैदानी खेळ खेळणे , व्यायाम करणे यासारख्या सवयी आत्मसात कराव्यात असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.तसेच कोरोना सारखी महिमारी संपूष्टात यावी यासाठी कोरोना चे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. 

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदिपकुमार गोरे सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. संजय जाधव , श्री खोबरे सर , श्रीमती मनिषा माने मॅडम , श्री. प्रविण गोरे , श्रीमती उषा मिसाळ मॅडम, श्रीमती शितल देशमुख मॅडम , श्रीमती बलसुरे मॅडम ,श्रीमती तावरे मॅडम यांनी प्रयत्न केले .

 
Top