उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात राबवलेल्या विकास कामांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी आज दि.09 मार्च 2022 पासून जिल्ह्यातील 63 गावांमध्ये 17 मार्च 2022 पर्यंत तीन कलापथकांचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

  शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामुख्याने आधुनिक माध्यमांचा वापर केला जातो. यात वृत्तपत्र (मुद्रीत माध्यम) आकाशवाणी, दूरचित्रवाणी, आऊट डोअर पब्लीसी अर्थात होर्डिंग, चित्ररथ, एलईडी व्हॅन आणि अलीकडे समाज माध्यमांचा वापर केला जातो. तथापि, महाराष्ट्रात पारंपरिक माध्यमांचाही वापर केला जातो. यात महाराष्ट्रातील लोककलावंतांचा, लोककला सादर करणाऱ्या कलापथकांचाही वापर केला जातो. लोककला हे एक प्रभावी माध्यम असून मनोरंजनातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवता येते. याच अनुशंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलापथकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 येथील जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित या कलापथकांच्या कार्यक्रमासाठी राज्य शासनाच्या 14 ऑक्टोबर 2021 मधील शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या तीन कलापथकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात उस्मानाबाद येथील ईश्वर प्रभू कलामंच, गोरेवाडी येथील आदर्श लोकजागृती कलामंडळ आणि तुळजापूर येथील महिषासूर मर्दिनी सांस्कृतिक लोककला मंचचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाजार भरणाऱ्या गावांची कार्यक्रमासाठी निवड केली आहे.

 हे कलापथकाचे कार्यक्रम कळंब तालुक्यातील मस्सा (खं),दहिफळ, खामसवाडी, शिराढोण, मंगरुळ, गौर, ईटकूर आणि येरमाळा, भूम तालुक्यातील वालवड, पाथ्रुड, अंभी, ईट, बावी, भूम शहर, अंभी (जि.प.गट) आणि आष्टा (जि.प.गट), परंडा तालुक्यातील जवळा (नि.), डोण्जा, सोनारी, कुककडगाव, चिंचपूर (बु.), शेळगाव, आनाळा आणि परंडा शहर, तुळजापूर तालुक्यातील सलगरा (सि.), काटी, अणदूर, ईटकळ आणि जळकोट, उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा, कोंड, अंबेजवळगे, बेंबळी, पाडोळी, कसबे तडवळे, येडशी, तेर, समुद्रवाणी, ढोकी आणि केशेगाव, उमरगा तालुक्यातील नाईचाकूर, तुरोरी, कसगी, पेट सांगवी, डिग्गी, नारंगवाडी, गुंजोटी, बलसूर, येणेगूर, दाळिंब आणि आलूर, लोहारा तालुक्यातील अचलेर, माकणी, आष्टा कासार, सास्तूर आणि जेवळी, वाशी तालुक्यातील बावी, इंदापूर, पारा, तेरखेडा, पारगाव, मांडवा आणि वाशी शहर या गावी होणार आहेत.

 
Top