परंडा / प्रतिनिधी:-

 दिनांक मार्च 8 रोजी परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सनराईज स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम राजमाता जिजाऊंच्या व विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोरोना काळामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव येथील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशालेतील मुलींनी समाज सेविका,नेत्या,डॉक्टर, पोलीस,अधिकारी,अंतराळवीर, खेळाडू,अभिनेत्री विविध क्षेत्रातील उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या महिलांची वेशभूषा सादर केल्या.या कार्यक्रमातून लेक वाचवा लेक शिकवा असा संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संभाजी देवकर,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोनिका काळे,गवले एस एस आरोग्य सहाय्यक,मारलेवाड एम एम आरोग्य सेविका,गवळी एस एस स्टाफ नर्स,लंका शेवाळे परिचर,पूजा लव्हाळे या होत्या.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा दैन यांनी तर कार्यक्रमाचे आभार नूरजहाँ शेख यांनी मानले.सारिका खवने,सारिका जामदरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला पालक प्रतिनिधी पठाण यांचा देखील सन्मान करण्यात आला.म्हणून सर्व विद्यार्थ्यांना पालक गणेश वाघमारे यांनी खाऊचे वाटप केले.

यावेळी सहशिक्षक प्रकाश शिंदे, राहूल शिंदे,कैलास दैन ,तानाजी आमटे इतर कर्मचारी सूर्यकांत औतडे,संतोष भिल्लारे,पप्पू भोगील यांनी विशेष सहकार्य केले.

 
Top