तेर / प्रतिनिधी-
महीलानी स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे जागतिक महीला दिनानिमित्ताने सोशल अँड युजेकेशन डेव्हलपमेन्ट आसोशियन वेल्फेअर व उद्योजक संजय इंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने तेर येथील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या 55 महिलाचा सन्मान करण्यात आला .
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील , तुलसी महिला पतसंस्था चेअरमन नंदाताई पुनगुडे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक नागनंदा मगरे ,भाजप महीला जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे , भारतीय जनता पार्टीच्या महीला उपाध्यक्षा विदया माने, जागजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाँ स्नेहल क्षिरसागर ,डाँ प्राचि माळी ,तेरच्या माजी सरपंच सुवर्णा माळी, भाजप युवती जिल्हा अध्यक्षा पुजा राठोड उपस्थित होत्या .
या कार्यक्रमात आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनिस ,बचत गटाच्या सिआरपी, ग्रामसखि ,बँक सखी ,तसेच विशेष सत्कार मुर्ति त्रिशाला माळी , सफाई कामगार सागरबाई रसाळ आणि नानिबाई कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग बगाडे मज्जित मनियार , इर्शाद मुलानी,फातिमा मनियार, मायाताई लोंढे, देवकन्या जगदाळे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष बिभीषण लोमटे यांनी केले तर प्रास्ताविक जोशीला लोमटे यांनी केले.