तुळजापूर / प्रतिनिधी-

 ग्राहकाकडे पावती जरी नसली  तोंडी सांगितले असली  तरी सुध्दा नवीन कायद्यान्वय ग्राहकांना ग्राहक मंचात तक्रार करता येते, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन अन्नसुरक्षा आयोग सदस्य  संपतराव जळके यांनी केले. 

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व अन्न आणि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच वैध मापनशास्त्र यंत्रणा, उपनियंत्रक, लातूर व उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या  कार्यक्रमात ते बोलत होते

या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी   नायब तहसिलदार  जाधव   हे होते.  या प्रसंगी बोलताना   जाधव   यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व विद्यार्थी व शिक्षक यांना पटवून दिले.खरेदी करतांना ग्राहक म्हणून आपण वजन व मापे या संबंधी कोणती काळजी घ्यावी ,दुकानदारांना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे व्यापारी यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत या विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. वजन मापे संबंधी कोणतीही तक्रार असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले. संपतराव जळके  यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांचे अधिकार , त्यांचे कर्तव्य ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक म्हणजे कोण , आपली फसवणूक झाली तर कोठे संपर्कक करावा,या विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांना सोप्या व रोजच्या जीवनातील आलेले अनुभव कथन करून सांगितले.

श्री पवार  (निरीक्षक - वैध मापनशास्त्र यंत्रणा ) यांनी हातातील तराजू मध्ये हालचालखी करुन कसे मापात पाप करता येते त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व आपली फसवणूक होवु नये यासाठी काय करावे याची सविस्तर प्रात्यक्षिक सह माहीती दिली.  यावेळी उपस्थितांचे मा.प्राचार्य श्रीमान  घोडके यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top