वाशी  / प्रतिनिधी-

  जिल्हा समाज कल्याण उस्मानाबाद व पंचायत समिती वाशी  यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय वाशी येथे दिव्यांगाची तपासणी शिबिर व यूआयडी कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी वाशी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रमोद शिंदे वै. अधीक्षक वाशी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजगुरू साहेब तसेच सामज कल्याण विभाग चे निरीक्षक सुभाष शिंदे साहेब व जिल्हा ग्रामीण रुग्णालय उस्मानाबाद येथील डॉ. गणेश पाटील ( अस्थिव्यंग विभाग ) , डॉ.शेळके साहेब ( मतीमंद विभाग ) , डॉ. महेश पाटील व डॉ. नरवडे साहेब ( नेत्र विभाग ) यांच्या मार्फत वाशी तालुक्यातील एकूण अस्थिव्यंग - १६८ , मतीमंद - ७१ , अंध - ५८  असे एकूण - २९७  रुग्णाची तपासणी करण्यात आली.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील उपस्थित टीमचे स्वागत सत्कर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शिंदे साहेब ( वै.अधिक्षक वाशी ) यांच्या हस्ते करण्यात आले. व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बप्पा कवडे हे होते . व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकृष्ण लहू कवडे (आरोग्य सभापती व पाणी पुरवठा विभाग नगर पंचायत वाशी ) हे होते  तर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन 

राष्ट्रवादी दिव्यांग सेल महाराष्ट्र चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण डोके यांनी केले .हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  पंचायत समिती वाशीचे सी.बी.खरपुडे व ए.एन. सोनार ( आरोग्य विस्तार अधिकारी प.स.वाशी ) एस.बी. माने सर ,माचवे साहेब ( विस्तार अधिकारी प.स.वाशी ),कोंडेकर साहेब ( क.प्र.अ. पण.स.वाशी ), सुर्यवंशी व.स. व निवासी मुकबधीर विद्यालय वाशी शाळेचे मुख्याध्यापक प्रताप भायगुडे सर व निवासी मतिमंद विद्यालय वाशी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर तसेच प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत उंदरे  यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.


 
Top