उमरगा / प्रतिनिधी-

तुरोरी ता. उमरगा येथे तुकाराम बिजेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण, गाथा भजन, किर्तन सेवा, काल्याचे किर्तन, गुलाल-पुष्पवृष्टी, जबरदस्त भारूडाची मेजवानी व जंगी कुस्त्यांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

तुरोरी ता. उमरगा येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्त १३ मार्च ते २० मार्च या सप्ताहात संपन्न होत आहे. या दरम्यान दररोज पहाटे ४ ते दुपारी १ या वेळेत काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण, गाथा भजन होणार आहे. तर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत हभप  अवधूत महाराज पुरी आष्टा (ज.) यांची श्रीमद भागवत कथा होईल. तसेच दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सुश्राव्य व प्रबोधनपर अशा किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि १३ हभप पुरूषोत्तम महाराज पाटील बुलढाणा, सोमवार दि १४ हभप महेश महाराज माकणीकर, मंगळवार दि १५ हभप जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर, बुधवार दि १६ हभप निलेश महाराज कोरडे,किल्ले शिवनेरी, गुरूवार दि १७ हभप शिवलीलाताई पाटील बार्शी, शुक्रवार दि १८ हभप जयंत महाराज बोधले पंढरपूर, शनिवार दि १९ हभप हरि महाराज लवटे अचलबेट,  यांची कीर्तन सेवा लाभणार आहे. तसेच रविवार दि २०  हभप ज्ञानेश्वर महाराज चातुर्मास्ये पंढरपूरकर यांचे काल्याचे किर्तन, गुलाल-पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे वाटप  होणार आहे. त्यानंतर लागलीच नाथ मंदिर येथे भारूडाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि २१ रोजी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. संत तुकाराम महाराज  मंदिर परिसर अध्यात्म व भक्तीभावात व्यापणार आहे. तर  छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा परिसर, गावातील मस्जीद व इतर मंदिरे विद्युत रोषणाईने उजळणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तुरोरीचे सरपंच सौ मयूरी नितीन जाधव, उपसरपंच तुकाराम जाधव, शिवसेना शाखा प्रमुख विजयकुमार भोसले, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, अशोकराव जाधव, सुभाष जाधव, प्रतापराव तपसाळे, प्रदिप जाधव, प्रभाकरनाना जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पवन जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी उपसरपंच पंडित शिंदे, विजयकुमार शिंदे, तुकाराम मंमाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य भजनी मंडळांनी केले आहे.


 
Top