कळंब / प्रतिनिधी-

 दि.१४ एप्रिल २०२२ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंतीच्या उत्सवाच्या नियोजनासाठी दि.१२ मार्च २०२२ रोजी पुतळा परिसर,गार्डनमध्ये स्मारक समितीचे विश्वस्त माजी नगरसेवक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले व बैठकीत सर्वानुमते खालीलप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समिती,पुतळा परिसर  निवडण्यात आली.

 अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे तर उपाध्यक्ष सुमित रणदिवे, कोषाध्यक्ष शिवाजी सिरसट,सचिव राजाभाऊ गायकवाड,सहसचिव चरणसिंह गायकवाड,मुख्य संघटक दिलीप कसबे,प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके तर सल्लागारपदी डॉ. एस.एम.कांबळे, प्रा.अरविंद खांडके,प्रमोद ताटे,मुकेश गायकवाड,नामदेव गायकवाड,सागर पट्टेकर,सुरज गायकवाड,प्रविण गायकवाड आदींची निवड करण्यात आली.

मध्यवर्ती सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.९ एप्रिल ते १२ एप्रिल यादरम्यान विविध व्याख्यानाचे व भीमगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 
Top