उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरेदी विक्री संघ, तुळजापूरच्या चेअरमन पदी शिवसेना पक्षाचे सुधीर कदम आणि व्हाइस चेअरमन पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  संजय धुरगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार खासदार ओमराजे निंबालकर यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी संचालक सुनील जाधव, संचालक मानीक तोडकरी, संचालक भैरू जाधव, संचालक श्रीकांत वागे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती श्यामालताई वडणे, युवासेना अल्पसंख्यांक जिल्हा प्रमुख श्री. अमीर शेख, शहर प्रमुख  बापूसाहेब नाईकवाडे, माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार, चेतन बंडगर, राजू जाधव , सोमनाथ गीते,   गजानन कदम,   माळी साहेब,  पिणू भोसले,  रविंद्र डबडे,  रामदास गोरे, सिद्रामाप्पा कारभारी,   बालाजी सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top