उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याचा २०२२-२३ च्या अर्थसंकल्पामध्ये तुकाराम गाथेचे लेखक संत  संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळ सुदुंबरे या ठिकाणास तीर्थ क्षेत्राचा व पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन पर्यटनस्थळाच्या विकासासाठी १० कोटीचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री  अजितदादा पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्व निर्णय घेतला आहे.या अभूतपूर्व निर्णयामुळे आभार व्यक्त करून उस्मानाबाद जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज चौक येथे पेढे वाटुन आनंद साजरा करताना जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले,युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे,लक्ष्मण निर्मळे,जेष्ठ आघाडी उस्मानाबाद शहराध्यक्ष शिवलिंग होनखांबे,जेष्ठ आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेंगले,दादासाहेब घोडके,जितेंद्र घोडके यांच्यासह जिल्हयातील समाज बांधवांनी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे. 

 
Top