परंडा / प्रतिनिधी:-

  भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने शेतात उभे असलेल्या संपूर्ण ऊस पिकांची तोडणी करेपर्यंत ऊस कारखाने चालू ठेवण्यात यावे यासाठी तहसिल कार्यालय परंडा येथे निवेदन देण्यात आले.

  आज मितीस परंडा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतीमध्ये ऊस पिक उभे आहे. शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत करून पिकविलेल्या ऊसाची तोडणी हंगाम सरत आला तरीही कारखान्याकडून करण्यात येत नाही. शेतकऱ्याच्या ऊस तोडण्यासाठी कारखान्यांकडून अडवणुक करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने साखर कारखाने ऊस गाळप बंद करण्याच्या मार्गावर आहेत. जर साखर कारखाने बंद झाले तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे पुर्णपणे गाळप होईपर्यंत परंडा  तालुक्यातील साखर कारखाने चालु ठेवावेत तसेच तालुक्यातील सर्व गावातील तलाठ्याकडे शिल्लक ऊसाचा सर्वे करण्यात यावा तसेच शेतकऱ्यांचा उभा असलेला ऊस नेण्यासाठी कारखान्यांना योग्य त्या सुचना करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

  या निवेदनावर प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अनिल पाटील, किसान मोर्चा अध्यक्ष कांतीलाल पाटील, शिवाजी पाटील, राहुल जगताप, सागर पाटील, महादेव बारस्कर, तुकाराम हजारे, अमोल गोफणे, शरद कोळी, सारंग घोगरे, स्वानंद  पाटील, समिर पठाण, श्रीकृष्ण शिंदे, साहेबराव पाडुळे, संजय अनभुले, सागर मल्हारे , सोमनाथ सुतार, यशराज पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.

 
Top