उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी नेहमी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. शाळेमध्ये दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात वाजता विद्यार्थी/विद्यार्थिनी चे कराटे प्रशिक्षण घेण्याचे आयोजन करण्यात आले. आज प्राथमिक शाळा आळणी येथील प्रांगणात मुख्यध्यपक बशीर तांबोळी यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला .
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने मुख्याध्यापक शीर तांबोळी यांच्या संकल्पनेतून सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षक सय्यद सर हे सकाळी विहित वेळी गावात येऊन विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व सांगून अल्पदरात प्रशिक्षण देतात. या प्रशिक्षणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी येथील चौथी ते सातवी चे 22 विद्यार्थी/विद्यार्थीनी लाभ घेत आहेत
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी ,शिक्षक श्री हनुमंत माने शिक्षिका श्रीमती सुनीता कराड ,श्रीमती अनिता देशमुख व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.