उमरगा  (प्रतिनिधी) : आपल्या देशाला प्रदूषणमुक्त, शक्तीशाली व समृध्द बनविण्यासाठी पाण्याचे नियोजन, पर्यावरणाचे संवर्धन, परिसर स्वच्छता, महिलांची सुरक्षितता, आरोग्य संवर्धन करण्यासाठी युवकांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी तरुणांनी सेवाभावी वृत्तीने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांनी केले. गणेशनगर, ता.उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘ ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक विशेष शिबीरा ‘ प्रसंगी  उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. प्रारंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांनी श्रमदान केले.  यावेळी गणेशनगरच्या सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतीश पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, मुख्याध्यापक सुभाष राठोड, सहशिक्षक शाहूराज माने, संजय चव्हाण आदिंची प्रमुख उपस्थिती होती.          

दरम्यान  प्रा. डॉ. संध्या डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. महेश मोटे, डॉ. विलास खडके, विद्यार्थी प्रतिनिधी अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, योगेश पांचाळ, अंजीवनी स्वामी, अमोल कटके, संतोष कांबळे, आकाश पांचाळ, नामदेव शिंदे, अक्षय कांबळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवी आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी, ग्रामस्थ उपस्थित होते.   

  

 
Top