परंडा / प्रतिनिधी-

 मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा म्हणून वेळोवळी नगरपरिषद परंडा यांच्याकडे  शहरातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने दिली आहेत. पण सबंधित आधिकारी यांनी साफ दुर्लक्ष केल्यामुळे. सर्व सामान्य नागरिकांतुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

 दिवसभर बैल व गाई शहरातफिरत असुन याचा त्रास भाजी मंडईतील  व्यवसाईकांना सहन करावा लागतो तसेच हीच जनावरे दिवसभर शहरात असतात. पण रात्रीच्या वेळी शहरा शेजारी अंदाजे १ ते २.कि मी अतंरावरील शेतकऱ्यांचे उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी करीत आहेत. तेव्हा सबंधित आधिकारी यांनी या कडे त्वरीत लक्ष देऊन शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करावा,अशी मागणी माजी  नगराध्यक्ष मुकुल देशमुख यांनी केली आहे.


 
Top