उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या र्मार्गदर्शनाखाली   छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे विरोधी पक्षनेते  देवेंद्र  फडणवीस यांनी राज्यातील बदल्यामधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलीसांनी  देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा  तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टी संपुर्ण ताकतीने मा.देवेंद्र फडणवीस यांच्या पाटीशी उभी असेल. तसेच माविआ सरकारने दिलेल्या नोटीशीच्या निषेधार्थ   नोटीशीची होळी करून आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

 या आंदोलन प्रसंगी नितीन काळे, ॲड.खंडेराव चौरे,ॲड.नितीन भोसले,  सुनिल काकडे,  प्रदिप शिंदे, राहुल काकडे, अभय इंगळे,दाजीप्पा पवार, पांडूरंग लाटे, लक्ष्मण माने, गजानन नवालडे, अभिराम पाटील, प्रविण सिरसाठे, सुजित साळुंके, राज निकम, अमोलराजे निंबाळकर, प्रितम मुंडे, विनोद निंबाळकर, उदय देशमुख,  संदिप इंगळे, अमोल पेठे,  नामदेव नायकल, प्रसाद मुंडे, सुनिल पंगुडवाले, सागर दंडनाईक, ज्ञानेश्वर सुळ, किशोर पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला.

 
Top