उस्मानाबाद (प्रतिनिधी)
महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित सौ.कमलताई कुंभार यांचा सत्कार आळणी येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी एसबीएनएम महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज ननवरे,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गाझी शेख, एस.पी.पॉलिटेक्नीकचे प्राचार्य अमर कवडे,डॉ.गणेश मते,प्रा. सुबोध कांबळे,दत्तात्रय घावटे,राम सुतार,अभिरुद्र सुतार,दत्ता काकुर्णे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.