पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करावे , असे आवाहन करून  खा. सदाशिवराव लोखंडे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधून ग्रामीण भागात काम करत असताना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. त्या आपण वरीष्ठांपर्यंत पोहचवून शिवसैनिकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्ववजी ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना संपर्क अभियान धाराशिव तालुक्यात सुरू असून गावोगाव सभा, बैठकांच्या माध्यमातून शिवसैनिकांशी थेट संपर्क साधला जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले झाले आहे.   शिवसंपर्क अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील ढोकी, पाडोळी येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी शिवसंपर्क अभियानाचे खास दूत म्हणून आलेले सुधाकर देसाई व लक्ष्मण नेहरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत खा. लोखंडे  म्हणाले की, गावपातळीवर नेटाने शिवसेनेचे संघटन वाढवून पक्ष मजबुतीसाठी झटणार्‍या सर्व शिवसैनिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात येईल. महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. तर सुधाकर देसाई व लक्ष्मण नेहरकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. सर्व सभांना शिवसेनेचे तालुका उपप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हा परिषद गटप्रमुख, पंचायत समितीचे गणप्रमुख, गावागावांतील शाखाप्रमुख, इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसंपर्क अभियानामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top