उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा स्त्री रूग्णालय, उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ. मनिषा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार प्रतिभा आरोग्य शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमासाठी स्त्री रूग्णालय च्या अधिक्षक डाॅ स्मिता गवळी,डाॅ बाराते मॅडम,भंडारे सिस्टर, भाटे मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष सौ किरणताई निंबाळकर, सौ संगिता काळे  , सौ मनिषा केंद्रे  ,सौ मंजुषा खळदकर, सौ मिनाक्षी जाधव, भाग्यश्री तनमोर,संगिता कोळगे, कविता पौळ उपस्थित होत्या.  कारक्रमाचे उद्घाटन डाॅ स्मिता गवळी यांनी केले .प्रास्ताविक करताना मनिषा पाटील  यांनी केले.  

 आरोग्य शिबीरात पिशवीच्या कॅन्सर ची तपासणी, तसेच हिमोग्लोबीन तपासणी खचून line list संग्रहीत केली, तसेच तंबाखु सेवन करणार्या महिलांची यादी करून घेतली आणि उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. शिबिरासाठी मराठे सिस्टर, साळुंखे सिस्टर, चव्हाण सिस्टर, इंगळे सिस्टर आणि खुने सिस्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top