उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मौजे मेडसिंगा येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक 19 मार्च ते 25 मार्च 2022 या कालावधीत विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. निर्मल ग्राम व जलसंवर्धनासाठी युवक हा संकल्प घेऊन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या दरम्यान मौजे मेडसिंगा येथे ग्रामस्वच्छता, शोष खड्डे, रस्ता दुरुस्ती, वृक्षारोपण, इत्यादी कामे करण्यात आली. याबरोबरच प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यामध्ये मानवी जीवनात श्रमाचे महत्व या विषयावर प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले तसेच संत साहित्य व सामाजिक मूल्ये या विषयावर प्रा. डॉ. एस. ए.घोडके तर थोडंसं जगणं समाजासाठी या विषयावर रणजीत दांगड यांनी मार्गदर्शन केले तसेच ग्राम विकासात युवकांची भूमिका या विषयावर प्रा. डी. एम.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच तसेच मराठी कवितेतील सामाजिकता या विषयाच्या अनुषंगाने डॉ. शिवाजी गायकवाड प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर प्रा. हनुमंत पडवळ यांनी सामजिक आशयाच्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर महिला मेळावा व हळदी-कुंकू कार्यक्रमात सौ. संगीता काळे ( मराठवाडा वृत्तपत्र जिल्हा प्रतिनिधी) सौ मोहिनी लांडगे, प्रा.श्रीमती बि. व्ही. गोंदकर, श्रीमती एस. एम. पवार , प्रा. सौ. शिल्पा डोळे, प्रा. सौ. एस. एस. आकोसकर, प्रा. सौ. स्वाती बौंनवाड, सौ सरवदे मॅडम, प्रा. सौ. वनिता बाबर इत्यादी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्य या विषयावर डॉ. एन. एच. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महिला उद्योजकतेच्या क्षेत्रात काम केल्यामुळे 8 मार्च 2022 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ति हा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सौ. कमलताई कुंभार यांनीही महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे या संदर्भात मौलिक विचार मांडले.

विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. पी.एन .दापके म्हणाले की,” विशेष श्रमसंस्कार lशिबिरातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते तसेच आत्मविश्वास निर्माण होतो. समाजातील कष्ट करणाऱ्या माणसाप्रती संवेदनशीलता निर्माण होते त्याबरोबरच धार्मिक सहिष्णुता ,सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीयत्वाची भावना मनात निर्माण होण्यासाठी असे विशेष श्रमसंस्कार शिबिर महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन केले.”

 या समारोप समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,” महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात जेव्हा जेव्हा आसमानी आपत्ती निर्माण होते. तेव्हा तेव्हा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा विद्यार्थी समाजाच्या मदतीसाठी सहकार्यासाठी धावून गेलेला आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासून आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कार्य करत आलेला आहे. विशेष श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवक हा स्वावलंबी बनावा, राष्ट्रप्रती प्रेम निर्माण व्हावा, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण व्हावी  यासाठी तो धडपडत असतो. त्याच्या या धडपडीतूनच उद्याचा बलशाली भारत निर्माण होण्यास नक्की मदत होईल असे प्रतिपादन केले”. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा माधव उगीले यांनी मौजे मेडसिंगा येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात वृक्षारोपण, शोष खड्डे, रस्ता दुरुस्ती, ग्राम स्वच्छता व तसेच स्वयंसेवक व ग्रामस्थांचे प्रबोधनपर केलेल्या कामाचा आढावा घेतला.

 याप्रसंगी कु. वैष्णवी सरडे, ऋषिकेश शिंदे, विशाल माने इत्यादी विद्यार्थ्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरात आलेल्या अनुभवाचे कथन केले तसेच मौजे मेडसिंगा येथील ग्रामस्थांच्यावतीने शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री विनोद लांडगे यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिरात केलेल्या कामाबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले. यावेळी मौजे मेडसिंगा येथील श्री, अनुरथ दूधभाते (सरपंच) ,श्री ,राम किशन शित्रे, (उपसरपंच),सिद्धेश्वर शेलार (सदस्य ग्रा. पं.) किशोर आगळे सदस्य( ग्रा. पं ) किशोर साळुंखे, काका शेलार( उपाध्यक्ष, भा ज. पा.), श्री आंगद आगळे (ग्रामविकास अधिकारी), काका भोजगुडे(प्रगतशील शेतकरी), इत्यादी उपस्थित होते. तर महाविद्यालयातील डॉ. महाडीक सर, डॉ. फुलसागर सर, प्रा. नागरगोजे सर ,प्रा. सौ. स्वाती बैनवाड, प्रा. सौ. वनिता बाबर, प्रा. मारुती लोंढे, प्रा. डॉ. वैभव आगळे, सेवक मुळे, दादा माळी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा. बालाजी नगरे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. मा. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने मौजे  मेडशिंगा येथील विशेष श्रमसंस्कार शिबिर यशस्वी झाले.


 
Top