उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांचा जन्मदिन गुरूवारी (दि.२४) उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा (बु.) येथे विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण, कीर्तन, भजन, अभिष्टचिंतन, सर्वरोग निदान, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच पत्रकार श्री. रणदिवे यांचे संत-महंतांसह वारकरी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जंगी सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

पत्रकार श्री. रणदिवे यांच्या हस्ते त्यांच्या जन्मगावी सारोळा (बुद्रुक ) येथे सकाळी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी, अंबाबाई देवीचे पादुका पूजन, भगवान शिवशंकर श्री महादेवांच्या मंदिरात महाभिषेक -महापूजा, ग्रामदैवत बालपीर साहेब दर्गाहावर फुलाची चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर धनंजय रणदिवे मित्र मंडळ व तेरणा ट्रस्टच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात ५४५ जणांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. रक्तदान शिबिरात १५ बहाद्दरांनी रक्तदान केले. सारोळा येथे ३० लक्ष रुपयाचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या २४ हायमस्ट लॅम्प व २० लक्ष रुपयाच्या पेवर ब्लॉक रस्ता कामाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर ग्रामस्थांना अन्नदान करण्यात आले. सायंकाळी भजन महोत्सव व श्री. रणदिवे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदारपणे पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. रणदिवे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर यांची अमृत कीर्तन सेवा झाली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पैठण पीठाचे पीठाचार्य तथा अखिल भारतीय वारकरी संप्रदाय परिषदेचे अध्यक्ष हभप प्रकाश बोधले महाराज तर हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज सूर्यवंशी, हभप रघुनंदन पुजारी महाराज, हभप राम पांचाळ महाराज, हभप योगेश बप्पा इंगळे महाराज, हभप राजाभाऊ देवगिरे महाराज, हभप बबन मिटकरी महाराज, हभप श्रीधर बारखडे महाराज, हभप काका उंबरे महाराज, हभप वामन महाराज शेळके, हभप महादेव महाराज कासार, मृदंगाचार्य तात्या टिंगरे महाराज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सरपंच प्रशांत रणदिवे, भूम नगर पालिकेचे गटनेते संजय गाढवे, माजी पंस सदस्य सुरेश देवगिरे, माजी जिप सदस्य ॲड. शामसुंदर परीट-सारोळकर, छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे, सोसायटी चेअरमन भाऊसाहेब रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर देवगिरे, पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, दिपक जाधव, अजित माळी, अमजद सय्यद, पत्रकार सुरेश घाडगे, प्रमोद कांबळे, मुकूंद चेडे, गौतम चेडे, श्रीकांत कदम, बालाजी वडजे, श्रीनिवास भोसले, भैरवनाथ कानडे, उमाजी गायकवाड, भागवत शिंदे, हरी खोटे, जयराम शिंदे, दत्ता शिंदे, बालाजी साळुंके, संतोष शेटे, शिवा तिरगुळे, गणेश गवारे, निजाम शेख, उत्तम बनजोगळे, रावसाहेब मसे, शंकर स्वामी, विजयकुमार चाबुकस्वार, बालाजी कापसे, शिवाजी पडवळ, मुन्ना रणदिवे, संदीप रणदिवे, धनंजय काळे, पांडूरंग कुदळे, रामलिंग जगदाळे, शाहरूख सय्यद आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

५४५ जणांची तपासणी, १५ जणांचे रक्तदान

धनंजय रणदिवे मित्रमंडळ व तेरणा ट्रस्टच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात ५४५ महिला, पुरूषांसह शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. शिबिरात डॉ. अजित निळे, दिपक बाराते, अन्सू कुमार, अंकीत कुरकुटे, शंतनू कळंबे, तुषार कांबळे, लक्ष्मण इंगळे, परवीन सय्यद, विनोद ओहळ यांनी रूग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. तर सह्याद्री ब्लड बँकेच्या शिबिरात १५ बहाद्दरांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वीतेसाठी अल्केश पोहरेगावकर, जना पवार, गणेश माळी, स्वप्नील करंजकर यांनी परिश्रम घेतले.


 
Top