उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहराबाहेरील डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या वृद्ध, विधवा महिला व गरीब कुटुंबांना प्रहार शिक्षक संघटना, उस्मानाबादच्या वतीने शुक्रवारी अत्यावश्यक किराणा मालाचे किट देण्यात आले. 

जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने, उस्मानाबाद संपर्कप्रमुख धम्मदिप सवई, प्रकाश पवार यांच्या हस्ते किराणा वाटप करण्यात आले. तसेच कोरोनासारख्या भयावह अशा साथरोगप्रसंगी अहोरात्र रस्त्यावर उभे राहुन देशसेवा करणाऱ्या पोलीस बांधवांना चहा-पाणी करण्यात आले.

 
Top